रायगड : मुंबई-पुणे मार्गावरील अमृतांजन पूल स्फोटोद्वारे पाडण्यात आला आहे. नियंत्रित स्फोटाने हा पूल पाडण्यात आला. ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल 190 वर्षे जुना होता. लॉकडाऊनचा फायदा घेत हा पूल पाडण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे हा पूल अशाप्रकारे पाडणं शक्य झालं आहे. कित्येक वर्ष जूना पूल पाडावा अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. परंतु या महामार्गावर मोठी वाहतूक असते. सततच्या वाहतूकीमुळे हा पूल पाडणं शक्य होत नव्हतं. मात्र आता लॉकडाऊनचा फायदा घेत हा पूल पाडण्यात आला आहे. 


मुंबई-पुणे महामार्ग ज्यावेळी ब्रिटिशांनी बनवला होता, त्यावेळी 1830 मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. या पूलाखालून मोठी वाहतूक होत होती. मुंबईकडे जाणारी-येणारी वाहतूक येथून होत होती. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र आता हा पूल पाडल्यानंतर कित्येक वर्षांची ब्रिटिशकालीन आठवण इतिहासजमा झाली आहे.