मुंबई : सातारा येथील १९ व्या ग्रंथ महोत्सवाचं उदघाटन झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते संपन्न झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद मैदानात सुरू झालेलं हे चार दिवसीय ग्रंथ संमेलन विद्यार्थी आणि वाचक वर्गासाठी पर्वणी ठरणाराय. सातारा शहरातील राजवाड्यावरील गांधी मैदानातून यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली.


त्यात सामाजिक संदेश देणारे चित्ररथ होते. 25 शाळांमधील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ साहित्यिक प्रा. यशवंत पाटणे, दिनकर पाटील, शिरीष चिटणीस, वि. ना. लांडगे आदी मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती होती.