Loksabha Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे यावरुन खलबतं सुरु आहेत. तर, अनेक ठिकाणी जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मराठा समाज  प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धाराशिवमधी लोकसभेची निवडणूक प्रशासनासाठीच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. प्रत्येक गावातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीये. या उमेदवारांच्या अनामत रकमेसाठी प्रत्येक मराठा कुटुंबाकडून 100 रुपये देणगी दिली जाणार आहे. आतापर्यंत 50 जणांची उमेदवारी निश्चितही करण्यात आलीय. दरम्यान याबाबत 24 मार्चला अंतरवाली सराटीत बैठक होईल. त्यात उमेदवारांबाबत पुढील दिशा ठरवली जाईल. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.


मराठा आरक्षणासाठी सरकार ने सगेसोयरे अधिसूचने चे पालन न केल्याचा निषेधार्थ मराठा समाजाकडून आगामी धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी एक हजार उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक गावातून प्रत्येकी दोन उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी मराठा कुटुंबांकडून प्रत्येकी शंभर रुपयाची वर्गणी गोळा केली जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये सकल मराठा आंदोलकांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान लोकसभा मतदारसंघातील दहाही तालुक्यातील अर्ज भरून घेतले जात आहेत. आत्तापर्यंत 50 जणांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली आहे. 


मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला


मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा सल्ला वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. लोकसभेत गेल्यानंतरच प्रश्न सुटतात, कायदेशीर मार्गानं प्रश्न सोडवायचे असतील तर लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही आंबेडकरांनी म्हंटल होत. 


मनोज जरांगे-पाटील यांच्या अडचणीत वाढ


मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. आतापर्यंत 9 गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेत. शिरुर पोलिसांनी या गुन्हा प्रकरणात जरांगेंना नोटीसही बजावली मात्र ही नोटीस जरांगे-पाटलांनी स्वीकारली नाही. बीड पोलिसांनी एका जेसीबी आणि क्रेनला दंड ठोठावलाय, यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारासभेत वापरण्यात आलेल्या जेसीबीची माहितीही घेण्यात आलीय. त्यांच्यावरही कारवाईचे संकेत पोलिसांनी दिलेत.