हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : बेटी वाचवा देश वाचवा असा नारा देशभरात दिला जातो. मात्र त्यातच मुली नकोशी होत चालल्याच्या घटना वारंवार घडताना पहायला मिळत असत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या बाजुला दोन दिवसाची चिमुकली आढळली आहे. या चिमुकलीवर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे-नाशिक महामार्गावर मोशी टोलनाक्याजवळ आयआरबीचा कर्मचारी लघुशंकेसाठी नदीकाठी गेला असता त्याला प्लॅस्टिक पिशवीमध्ये काही तरी हालचाल होतांना दिसली. त्या पिशवीत साप असावा अशी शंका त्या व्यक्तीला आली. त्यामुळे पण पिशवी जवळ गेला असता त्यात दोन दिवसाची चिमुकली आढळून आली. त्या चिमुकलीस साडीच्या कपड्यात गुंडाळून प्लॉस्टिक पिशवीत ठेवले होते. 


अतिशय ह्रदय पिळवटनारी घटना असल्याचे सांगत कुतुब शेख याने चिमुकलीला स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. एका जागरुक नागरिकांच्या धाडसातून या चिमुकलीवर तातडीने उपचार झाल्याने नकोशी झालेली चिमुकली बचावली. चिमुकलीवर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहे 


नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगातही मनाला सुन्न करुन सोडणारी ही घटना आजच्या काळातही घडत आहे. मुलगी वाचवा देश वाचेल असे नारे दिले जातात. मात्र प्रत्येक्षात मुलगी नकोशीच झाली आहे.