कल्याणमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणा-या स्वाईन फ्ल्यूने कल्याण डोंबिवलीत सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
कल्याण : ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणा-या स्वाईन फ्ल्यूने कल्याण डोंबिवलीत सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत कल्याणमध्ये 2 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. मात्र याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरु करण्याचं आवाहन, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केलं आहे.
आतापर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या 753 संशयित रुग्णांची पाहणी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी 48 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात विशेष साथरोग कक्ष तयार करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलंय.