यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारताना आणखी २ शेतकऱ्यांचा मृत्यू
कीटकनाशक फवारताना आणखी दोन शेतकऱ्यांचा विशबाधेतून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वच जिल्ह्यात याच कारणामुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.
यवतमाळ : कीटकनाशक फवारताना आणखी दोन शेतकऱ्यांचा विशबाधेतून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वच जिल्ह्यात याच कारणामुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.
गजानन हणमंत नैताम आणि मधुकर बावणे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. गजानन हे ११ ऑक्टोबरला शेतात कीटकनाशक फवारनीस गेले. शेताक फवारणी करून ते घरी परतले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मधुकर बावणे यांचाही विषबाधेने मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे २० शेतकऱ्याचे हकनाक जीव या आधी गेले आहेत. साडेसातशेहून अधिक शेतमजुरांना विषबाधा झाली. कृषी केंद्रांमधून विनापरवानगी हे औषध विकले गेले. कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गुन्हे नोंदवीण्यात आलेल्या एकूण ८ कृषी केंद्रांपैकी दोघांवर दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच गुजरातच्या कीटकनाशक कंपनी विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला. मुकुटबन येथे गुजरातमधील यूपीएल कंपनीचे व्यवस्थापक आणि आनंद कृषी केंद्र चालक सुरेंद्र तातेड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
कीटकनाशक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.