व्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेमकरणातून तरूणाची हत्या?
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील बीबी येथील २२ वर्षीय तरुणाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
गावात तणाव
पाटण तालुक्यातील बीबी येथील हत्या झालेल्या २२ वर्षीय तरूणाचं नाव अक्षय जाधव आहे. या तरुणाचा याच तालुक्यातील येराड खंडूचीवाडी येथे प्रेमप्रकरणातून खून झाल्याची घटना घडली आहे. संबंधित प्रेमप्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घ्यावे अन्यथा तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मुलाच्या घरच्यांसह ग्रामस्थांनी घेतल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे.
प्रेमप्रकरणातून हत्येचा संशय
दरम्यान हा खून प्रेमप्रकरणातील संबंधित मुलगी व आईने केला असल्याचा संशय अक्षय याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. संबंधित मुलगी व आईला ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत अक्षय याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा या मंडळींनी घेतला आहे. वेळप्रसंगी या मृतदेहावर संबंधित मुलीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करू, असाही पवित्रा संबंधितांनी घेतल्याने पोलीस स्टेशन परिसरात तणाव पसरला आहे.