विष्णू बुरगे, झी २४ तास, बीड : बीडमध्ये आज २५१ किलोच्या फुलहाराने नेत्यांचं स्वागत करण्यात आलं, हा फुलहार उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. जेसीबीने गुलाल उधळण्याचा एक नवा ट्रेन्ड ऐकला होता. पण आता फुलहार तो देखील अडीच क्विंटल वजनाचा आणि त्याला उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. एवढंच नाही १५० किलो वजनाच्या फुलांची उधळण देखील नेत्यांच्या स्वागतासाठी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बीडमध्ये हा जल्लोष पाहायला मिळाला, भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या बीड दौऱ्यावर आहेत, त्यांच आणि छत्रपती संभाजी राजे यांचं देखील या फुलहाराने स्वागत करण्यात आलं. यानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी राजे यांचं स्वागत करण्यात आलं, यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी राजेंकडून जोरदार घोषणाबाजी केली.