राज्यात २६८२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद
बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक
मुंबई: राज्यात आज २६८२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६२,२२८ पर्यंत पोहोचला आहे. राज्यात रूग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता. आता तो १५.७ दिवस झाला आहे. तसेच राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ४३.३८% वर पोहोचले आहे. आज एका दिवसात ११६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक आज नोंदवण्यात आला आहे. एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३८ टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.३७ टक्के आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची आज १४६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत रुग्णांची संख्या ही २७५० पर्यंत पोहोचली आहे. आज कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ९२ झाली असून
-एकूण कोरोनावर मात केलेली संख्या ११७७ पर्यंत पोहोचली आहे.