नाशिक : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. हवामानातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच स्वाईन फ्लूने तिघांचा बळी घेतला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून नाशकात एकूण २५ जण स्वाईन फ्लूनं मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यभरात एकूण 55 जणांचा बळी गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे सांगलीतही गेल्या दीड महिन्यात सात जण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत. गेल्या १५ दिवसांत स्वाईन फ्लूचे १४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी ७ रूग्ण दगावले. आरोग्य यंत्रणेने याची गंभीर दखल घेत घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. २४ वैद्यकीय पथकं, ८३ स्क्रिनींग सेंटर्स, आणि १०२ आणि १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. सर्व 59 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 15 ग्रामीण रुग्णालयांमध्ये टॅमिफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा आहे.


स्वाईन फ्लूची लक्षणं


ताप, डोकेदुखी, अंग दुखणे, थकवा, अशक्तपणा, अति थकवा, छातीत दुखणे, कोरडा खोकला