Ajit Pawar on Seat Sharing : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष संघटना वाढवण्यासाठी तसेच निवडणुकीच्य अनुषंगाने ता.री करण्यासाठी अजित पवार अनेक ठिकाणचे दौरे करत आहेत. नाशिकमध्ये अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. कांद्यामुळे 3 सीट गेल्या असं अजित पवार यांनी म्हंटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्यामुळे लोकसभेतील 3 सीट गेल्याची कबुली अजित पवारांनी नाशिकमधील कळवणच्या लोकार्पण सोहळ्यात  दिली. कांदा निर्यात बंदी उठवण्यात आम्ही कमी पडलो. यामुळे महायुतीला अहमदनगर, पुणे जिल्ह्यात फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले. जिथे कांदा पिकत होता, तिथे आमचा वांदा झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.नगर ,पुणे जिल्ह्यात सुधा कांद्यामुळे फटका बसला. आम्ही मान्य करतो असे अजित पवार म्हणाले. 


तर पवारांची औलाद सांगणार नाही - अजित पवारांची ग्वाही


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्टॅम्प पेपरचा दाखला देत जनतेला आश्वासन दिलं. तुम्ही आशीर्वाद द्या, पुढली 5 वर्षं वीज माफी नाही दिली तर पवारांची औलाद सांगणार नाही अशी थेट ग्वाहीच अजित पवारांनी दिली. नाशिकच्या कळवणमध्ये आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधक खोटे आरोप करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. त्याचबरोबर डीपीडीसीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही वीज बिल माफीचा जीआर काढला असून पुढील पाच वर्षे शेतक-यांना एक रुपयाही वीजबिल येणार नसल्याचं म्हटलंय


महायुतीतील जागावाटपाबाबत अजित पवारांचे महत्त्वाचं विधान 


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतील जागावाटपाबाबत महत्त्वाचं विधान केलंय. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून विद्यमान आमदार असलेल्या जागेवर त्याच पक्षाचा दावा असल्याचं अजितदादांनी म्हटलंय. तर जागावाटपावर वरिष्ठ निर्णय घेतील असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी म्हटलंय.