मुंबई : 30 best places to visit in 2022 : कोकणातील निसर्ग संपन्न म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा  ( Sindhudurg) आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ( international tourism map) झळकला आहे. जगातील सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणच्या मानात तुरा खोवला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडन, सिंगापूर, इस्तंबूलच्या पंगतीत सिंधुदुर्गला स्थान मिळाले आहे. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर आला आहे.  तसेच सिंधुदुर्गाशिवाय गोव्यासह 9 भारतीय पर्यटनस्थळांचाही समावेश या यादीत आहे. जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश आहे.


सिंधुदुर्गातील स्वच्छ समुद्र किनारे, सिंधुदुर्ग किल्ला, थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीचा उल्लेख 'कोंड नेस्ट ट्रॅव्हलर इंडिया'  https://www.cntraveller.in/story/best-places-to-visit-in-india-world-2022-cnt-bhimtal-goa-shillong-seoul/  या मॅगझिनने केला आहे. हे मॅगझिन दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन यादी जाहीर करत असते. यात आता सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे 


जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाचे दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे. ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.