Onion Price Hike: अचानक कांद्याचे दर वाढले आहेत. 30 रुपये किलोवरुन कांदा 90 रुपये प्रती किलोवर पोहचला आहे. दिवाळी आधीच कांदा महागल्याने सर्व सामान्यांचे बजेट कोडमडले आहे. दोन दिवसात कांद्याची ही दरवाढ झाली आहे. मुंबईत कांदा प्रति किलो 90 रुपये दराने विकला जात आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात कांद्याची ही दरवाढ पहायला मिळत आहे. दिल्लीत कांद्याचा दर 80 रुपये प्रति किलो इतका आहे. 


नवरात्री उत्सवानंतर अचानक कांद्याची मागणी वाढली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्री उत्सवानंतर अचानक कांद्याची मागणी वाढली आहे. नवरात्रीपूर्वी मुंबई, दिल्लीसह भारतातील वेगवेगल्या शहरांमध्ये कांदा 20 ते 40 रुपये किलोने विकला जात होता. मात्र, आता काद्यांचे दर गणाला भिडले आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये किरकोळ बाजारात कांदा कांदा प्रति किलो 90 रुपये दराने विकला जात आहे. तर, दिल्लीत कांद्याचा दर  80 रुपये प्रति किलो इतका आहे. अचानक कांद्याच्या दरात सरासरी 40 रुपयांपर्यंतची दरवाढ झाली आहे. कांद्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 


कांद्याच्या दरांत 25 ते 50 टक्यांची दर वाढ


राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरांत 25 ते 50 टक्के वाढ झाली आहे. दिल्लीत कांदा 50 ते 70 रुपये किलो दराने विकला जात आहे.  खरिपात कांद्याच्या लागवडीखाली क्षेत्र घटल्यानं दर वाढले असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  नाशिकच्या अभोणा इथल्या खासगी बाजार समितीत 6 हजार तर पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची साडेपाच हजार प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. किरकोळ बाजारात देखील कांदा 50 रुपये किलोने विक्री होत आहे.  नाशिकच्या अभोणा इथल्या खासगी बाजार समितीत 6 हजार तर पिंपळगाव बाजार समितीत कांदा साडेपाच हजार प्रतिक्विंटल दराने विक्री झालाय. किरकोळ बाजारात देखील कांदा 50 रुपये किलोने विक्री होतोय.


मराठा आंदोलनामुळे एपीएमसी मार्केटमधील  कांदा बटाटा व्यवहार ठप्प


माथाडी कामगारांनी आज एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारलंय. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी एपीएमसी मार्केट आज बंद असेल. या बंदमुळे कांदा बटाटा आणि दाणा मार्केटमधील व्यवहार ठप्प झालेत.


कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली


कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.  दिल्ली-एनसीआरसह विविध शहरांमध्ये 25 रुपये किलोने कांदा विकला जाईल असा सरकारचा दावा आहे. यासाठी बफर स्टॉक केलेला कांदा सरकार विकणार आहे. राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) ) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAAFED) यांच्या मार्फत कांद्याची विक्री केली जाणार आहे.