कल्याण : कल्याण डोंबिवलीत क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोनाचे 33 रुग्ण वाढले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आता 424 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. पण कल्याण-डोंबिवलीकर याबाबत गंभीर नसल्याचं दिसून येतं आहे. लॉकडाऊनबाबत नियमांचं उल्लंघन सुरू आहे.


आज वाढलेले रुग्ण 


कल्याण पश्चिम - 11 रुग्ण.


कल्याण पूर्व -  8 रुग्ण 


डोंबिवली पश्चिम- 4 रुग्ण 


डोंबिवली पूर्व - 8 रुग्ण 


टिटवाला मांडा - 2 रुग्ण 


केडीएमसीने संपूर्ण महापालिका क्षेत्र लॉकडाऊन घोषित केलं असून जीवनावश्यक वस्तूंची दुकानात काऊंटर विक्री करण्यासं बंदी घातली आहे. फक्त होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. तरीसुद्धा दुकानं ही सुरूच असून काऊंटरवर मालाची विक्री सुरुच आहे. 


कल्याण-डोंबिवली परिसरात रुग्णांची संख्या एकीकडे चिंतेचा विषय बनला असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे बाहेर फिरत आहे.