रायगडावर साजरा होणार ३४६वा शिवराज्याभिषेक सोहळा
रायगडावर हजारो शिवभक्त उपस्थित राहणार
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी रायगडावर साजरा होतो आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. यानिमित्ताने विविध मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला दरवर्षी हजारो शिवभक्त रायगडावर येत असतात. यंदाही हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित राहणार आहेत. विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर संपूर्ण सोहळा होत असतो.