मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूमुळे सुरु असणाऱ्या तणावाच्या वातावरणातच काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील पालघर येथे अतिशय धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळालं. जिथे जमावाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत तीन साधूंना त्यांचा जीव गमावावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Palghar पालघर हिंसाचाराचे पडसाद सर्वच स्तरांतून उमटल्याचं पाहायला मिळालं, ज्या धर्तीवर आता एक मोठी कारवाई करण्य़ात आली आहे. 


कासा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे या पोलीस स्थानकाशी संलग्न असणाऱ्या एकूण ३५ पोलिसांची तातडीने बदली करण्यात आली आहे. सर्वत स्तरांतून या प्रकरणी कारवाईच्या मागणीने जोर धरल्यामुळे लगेचच काही महत्त्वाची पावलं उचलली गेली. ज्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे. दरम्यान, या प्रकरणी याआधीच दोन पोलिसांचं निलंबनही करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 


 


दरम्यान, या परिस्थितीचं गांभीर्य आणि त्याला मिळणारी वळणं पाहता सध्याच्या घडीला पालघर पोलिसांकडून गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींपैकी एक असल्यामुळे त्यांना वारंवार धमकी दिली जात होती, त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला या प्रकरणीचा सर्वतोपरी तपास सुरु असून, त्यावर अनेकांचं लक्ष आहे.