मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. जवळपास ८१ टक्के मतदानाची नोंद सोमवारी झालेल्या मतदानात झाली. सोमवारी १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील साधारण ३८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.तर काही ठिकाणी विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज ३ हजार ७०० ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. 


मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या


ठाणे- ३३
पालघर- ५०
रायगड- १६२
रत्नागिरी- १५४
सिंधुदुर्ग- २९३
पुणे- १६८
सोलापूर- १८१
सातारा- २५६
सांगाली- ४२५
कोल्हापूर- ४३५
उस्मानाबाद- १५८
अमरावती- २५०
नागपूर- २३७
वर्धा- ८६
चंद्रपूर- ५२
भंडारा- ३६१
गोंदिया- ३४१
गडचिरोली- २४