रायगड : रायगड जिल्ह्यातील ४ मच्छीमार बोटी अजूनही बेपत्ताच आहेत.


२६ खलाशांसोबत संपर्क नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ४ बोटींवरच्या २६ खलाशांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाहीये. बलवती, पद्मावती, रोहिदास आणि संत निर्वाण अशी या ४ बोटींची नावं आहेत. ३० नोव्हेंबरपासून या बोटींचा संपर्क तुटलेला आहे.


ओखी चक्रीवादळ रायगडच्या दिशेला


ओखी चक्रीवादळ आता रायगडच्या दिशेने सरकलंय. त्यामुळे येथील समुद्राला मोठी भरती आलीय.  जिल्ह्यातील २५० बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी २२१ बोटी सुखरूप परत आल्या आहेत.


काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 


ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी आणि समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे.



रायगड जिल्ह्यात दुपारपर्यंत ऊन पाहायला मिळत होत मात्र अचानक वातावरण बदललं आणि मळभ पाहायला मिळत आहे.