Railway Accident : रेल्वे ट्रॅकवर ओव्हरहेड वायर तपासणी करताना टॉवर वॅगनने 4 गँगमन चिरडले
Train Accident : लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात 4 गँगमन ठार झालेत. पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
Train Accident : लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ ( Lasalgaon railway station) झालेल्या अपघातात 4 गँगमन ठार झालेत.. पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झालाय. ओव्हरहेड वायर तपासणी (Railway Overhead wire checking) टॉवर वॅगनने रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या या गँगमनना धडक दिली होती. ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरचे इन्चार्ज आणि चालकाला लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी मृत कर्मचाऱ्यांचे सहकारी आणि नातेवाईक आक्रमक झाले होते.
रेल्वे कर्मचारी आणि नातेवाईक आक्रमक
ओव्हर हेड वायर तपासणी करणाऱ्या टॉवरच्या रेल्वे गाडीने चार गॅंग उडवल्याची घटना लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली असून यात चारही रेल्वे कर्मचारी या दुर्घटनेत ठार झाले आहे. या संदर्भात टॉवरचे इन्चार्ज आणि रेल्वे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक रेल्वे कर्मचारी आणि नातेवाईक आक्रमक झाले आहे.
मृत कर्मचाऱ्यांचे सहकारी आणि आक्रमक नातेवाईकांनी रेलरोको केला. नातेवाईकांनी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस तब्बल वीस मिनिटे रोखून धरली होती. अखेर पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आले. वीस मिनिटानंतर गोदावरी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. पोलिसांनी ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरचे इन्चार्ज आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.
लासलगाव रेल्वे स्थानकावर पहाटेच्या सुमारास टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधील ट्रॅक मेंटन करण्याचे काम सुरु असताना सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावर रेल्वेने धडक दिल्याने अपघातात गॅंगमनचा मृत्यू झाला आहे.
वॅगन ट्रेनने उडवलेले चार कर्मचारी
1) संतोष भाऊराव केदारे (38 ),
2) दिनेश सहादु दराडे (35),
3) कृष्णा आत्मराम अहिरे (40),
4) संतोष सुखदेव शिरसाठ (38)
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन...
निफाड तालुक्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन(टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमन चिरडले गेले. या दुर्घटनेत चारही गँगमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी निफाड येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतांच्या नातेनाईकांची भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं.