Sangmner Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार कैदी जेलमधून फरार झाले आहेत. कारागृहाचे गज कापून या कैद्यांनी पलायन केले आहे. संगमनेरमधील कारागृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना कैदी पळाले आहेत. पोलीसांचा आरोपींना पळविण्यात पोलिसांचा सहभाग तर नाहही याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. मात्र, या घटनेने कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा चार आरोपींनी सकाळी सात वाजेच्या सुमारास चक्क कारागृहाचे गज तोडून पालन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चार पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना उपकरागृहातील गज कापून पलायन केले आहे.  आरोपींनी कारागृहाचे जाड गज कापून पलायन केले. लोखंडाचा एवढा मजबूत गज आरोपींनी कोणत्या कटरने कापला असा प्रश्न देखील उपस्थित झाला. या धक्कादायक प्रकारामुळे संगमनेर पोलिस सुरक्षा व्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


राहुल काळे , मच्छिंद्र जाधव , रोशन थापा ददेल , अनिल काळे असे जेलमधून पसार झालेल्या आरोपींची नावे असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली. जेलमधून पलायन करणाऱ्या या चारही आरोपींवर बलात्कार आणि खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.  


संगमनेर पोलिसात खळबळ


जेलमधून कैदी पळून गेल्याने संगमनेर पोलिसात खळबळ उडाली आहे. कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्य न दाखवल्याने चार जणांनी गज कापून पलायन केले असल्याची चर्चा सुरू आहे. सकाळी उजेड पडल्यानंतर चार आरोपी सहजासहजी पळून जाऊ शकत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.