जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भुलोरी गावात काल दुपारी दोनच्या सुमारास शॉट सर्कीटमुळं आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ४० ते ५० आदिवासीयांचे घरे जळून खाक झाली आहेत. तर काही जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुदैवानं आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत लाखो रुपयांच नुकसानं झालं असल्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी अचानक वारा सुटला आणि गावातील विद्युत वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि त्यामुळे शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागली. अग्निशमन विभागाला संपर्क केला असता अग्निशमन दल गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यानंतर घटनास्थळी पोहचला. धारणी हे तालुका क्षेत्र असतांना सुद्धा येथे अग्निशमन दलाची सुविधा उपलब्ध नाही. 


येथे अग्निशमची एक गाडी असावी अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. या आगीत स्थानिक ग्रामस्थांचं घरगुती सामान तसेच जनावरांसाठी ठेवण्यात आलेल्या चारा पूर्णपणे जाळून खाक झाला आहे.