दुचाकीच्या डिक्कीतून ४२ हजार रूपये असलेली बॅग लंपास
दोघा भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या एका तासात गजाआड केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे
जळगाव : जळगाव एमआयडीसीमधील एका उद्योजकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ४२ हजार रूपये असलेली बॅग लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या एका तासात गजाआड केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे
दरम्यान पकडलेले दोघे हे अट्टल गुन्हेगार आहेत. एमआयडीसीच्या व्ही-सेक्टरमध्ये रमेश इंगळे यांच्या मालकीची त्रिभुवन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. ते आपल्या घरून दुचाकीने कंपनीत आले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगेत रोख ४२ हजार रूपये होते.
अट्टल गुन्हेगार राजू गुमाने उर्फ हाड्या आणि अजय बिरजू गारूंगे हे दोघे तेथे पोहोचले. कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता डिक्कीतील बॅग लंपास करणारे दोघे दिसून आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन अवघ्या तासाभरातच अजय आणि राजू यांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले.