मयूर निकम / बुलडाणा : 43 women and girls go missing in 18 days in Buldana : आता एक धक्कादायक बातमी. 18 दिवसात 43 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली आहे. महिला आणि मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 18 दिवसांत 43 महिला आणि मुली बेपत्ता धक्कादायक माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, 43 पैकी 19 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आहे.  


जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन 1 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील 29 महिला आणि 14 अल्पवयीन मुली अशा एकूण 43 महिला मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी समोर आली आहे..


यापैकी 7 अल्पवयीन मुली आणि 12 महिलांचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला यश आले आहे. मात्र, तरीही मुली आणि महिलांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेपत्ता होण्याचं प्रमाण गंभीर बाब असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कुटुंबात सुसंवाद घडणे आणि तरुण मुलींना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे, असे मत महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक पी एस उमाळे यांनी व्यक्त केले.