प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 45 लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मिरजोळे वसाहतीमध्ये कोकेनची विक्री होत असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी छापा मारला. यामध्ये सुमारे 45 लाख किमतीचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी हरियाणा आणि राजस्थान येथील तिघांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी परराज्यातील टोळी कार्यरत असल्याची टीपही पोलिसांना मिळाली होती. हे तिघेही अंमली पदार्थ विक्री करणारे असून त्यांची नावे दिनेश शुबेसिंह, रामचंद्र तुलीचंद मलिक आणि सुनिलकुमार नरेंद्रकुमार रनवा आहेत.


याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरिक्षक शिरीष सासणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मोबाईल फॉरेन्सीक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन या पथकाने या अंमली पदार्थांची घटनास्थळीच खात्री केली.