औरंगाबाद बोर्डाकडून बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
सामान्य गणित विषय निवडला असतानाही विज्ञान शाखेची परीक्षा दिल्यानं या विद्यार्थ्यांचे हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद बोर्डानं बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. सामान्य गणित विषय निवडला असतानाही विज्ञान शाखेची परीक्षा दिल्यानं या विद्यार्थ्यांचे हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
तसेच या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांना सुद्दा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर ४ परीक्षा केंद्रंही औरंगाबाद बोर्डानं कायमची रद्द केली आहेत.
बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या, त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. यातली तीन परीक्षाकेंद्रं औरंगाबाद जिल्ह्यातली, तर एक बीड जिल्ह्यामधलं आहे.