उस्मानाबादमध्ये ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून काढली धिंड
उस्मानाबादमध्ये एका ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये एका ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उमरगा तालुक्यातील आलूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
पत्नीच्या चारित्र्याबद्दल गावात चर्चा करून परिवाराची बदनामी केल्याचा राग मनात धरून एका जवानानं भावकितील एका महिलेला मारहाण करत तिची गावात धिंड काढली.
याप्रकरणी मुरूम पोलिसांत मारहाण केलेल्या जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीय.
महिलेला उमरगामधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
उस्मानाबाद | ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून काढली धिंड