कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडले

जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्यामुळं राधानगरी धरणाचे स्वयंमचलीत दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत. धरणाचे सातही दरवाजे दुपारी साडेबारा वाजता उघडले आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्यामुळं राधानगरी धरणाचे स्वयंमचलीत दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत. धरणाचे सातही दरवाजे दुपारी साडेबारा वाजता उघडले आहेत.
धरणातून 12 हजार 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर वीजनिर्मीतीसाठी 2 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं भोगावती नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.