इमारतीच्या गच्चीवरुन पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
इमारतीच्या गच्चीवर खेळत असताना तोल जाऊन खाली पडून एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.
मुंबई : इमारतीच्या गच्चीवर खेळत असताना तोल जाऊन खाली पडून एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाड़ी येथील ज्ञान प्रसाद इमारतीत चौथ्या मजल्यावर विजय काळे हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. काल सकाळी विजय काळे नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले तर त्याची पत्नी दुपारच्या सुमारास घरात झोपली होती.
यावेळी त्यांचा मोठा मुलगा ऋषिकेश हा गच्चीवर खेळण्यासाठी गेला. काही वेळाने जाग आल्यानंतर ऋषिकेश घरात दिसत नसल्याने विजय यांच्या पत्नीने त्याची शोधाशोध सुरू केली. थोड्या वेळानंतर इमारतीच्या मागील बाजूस डोकावून पाहिले असता ऋषिकेश निपचित खाली पडलेला दिसला. त्याचा इमारतीच्या गच्चीवरुन पडून मृत्यू झाला होता.
या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहे. मात्र चिमुकल्याच्या या अशा निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.