Ghatkopar Crime News : देशात आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे पोलिस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले आहेत. अशातच मुंबई उपनगरमध्ये घाटकोपर परिसरात लाखो रुपयांची रोकड सापडली आहे. जवपास 70 लाख रुपयांची ही रोकड आहे. निवडणूक अधिकारी आणि आयकर अधिकारी तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री पंतनगर पोलिसांनी गस्त घालत असताना एक संशियत कार थांबवली. या कारची  तपासणी केली असता. या कारमध्ये पोलिसांना सत्तर लाख रुपयांची रोकड आढळली.  काल रात्री पासून निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग याचा तपास करीत आहे. जे वाहन पोलिसांनी पकडले  त्यात दिलीप नाथानी, अतुल नाथानी हे दोन व्यक्ती बसलेले होते. रोकड हस्तगत करत पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. इन्कमटॅक्स सल्लागार असल्याचे दोघांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले. पंतनगर पोलिसांसह निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. हे पैसे कोणाचे आहेत आणि कशासाठी नेले जात होते? याचा पोलीस तपास करीत आहेत. मात्र या बाबत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


आचारसंहिता लागण्यापूर्वी तब्बल 300 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी 


पुणे महानगरपालिकेकडून अंदाजपत्रक जाहीर करण्यात आलं. आचारसंहिता लागण्यापूर्वी तब्बल 300 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठ्याची कामे केली जाणारेत. कामं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून, कामात उदासीनता दिसून आल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिलाय.


निवडणुका होईपर्यंत शासकीय कार्यालय परिसरात आंदोलन, उपोषण, मोर्चे, निदर्शने, घेराव यावर निर्बंध


छ. संभाजीनगरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालीये. या पार्श्वभूमीवर निवडणुका होईपर्यंत शासकीय कार्यालय परिसरात आंदोलन, उपोषण, मोर्चे, निदर्शने, घेराव यावर निर्बंध घालण्यात आलेत. तसंच याचं उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिका-यांनी दिलाय.