कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासूनच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागणार असण्याची शक्यता आहे.


७२ हजार शिक्षकांचा बहिष्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील ७२ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आणि कायम विनाअनुदानित शिक्षकांनी बारावी परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला. यामुळं लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असल्यानं यंदाचा बारावी परीक्षेचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. याचा विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. 


निकाल उशिरा लागणार


परीक्षेच्या तोंडावरच शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातल्यानं या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याचा तोडगा शासनानं लवकरात लवकर न काढल्यास बारावी परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.