धडगावजवळ तब्बल ७४ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त
नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील धडगाव जवळ तब्बल ७४ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त केला.
नंदुरबार : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील धडगाव जवळ तब्बल ७४ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त केला.
मध्यप्रदेशमधून गुजरातमध्ये या मद्याची तस्करी केली जात होती. यादरम्यान महाराष्ट्राच्या सीमेत असलेल्या धडगावमध्ये सापळा रचून उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. एका ट्रकमधून छुप्या पद्धतीनं ही तस्करी केली जात होती.
या कारवाईत विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. या आधी अशा स्वरूपाच्या मोठ्या कारवाया मुंबईच्या पथकाकडून केल्यात.