किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक महानगरपालिका हद्दीतील ७५ टक्के बांधकामं अनधिकृत असल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलाय. तुकाराम मुंढे यांच्या दाव्याने नाशिककरांसह पालिकेतील लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. तुकाराम मुंडे यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी ही माहिती दिल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये दोन लाख ६९ हजार मालमत्ता म्हणजे ७५ टक्के शहर अनधिकृत असल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोर्टात एका याचिकेदरम्यान केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे लोकप्रतिनिधी मात्र चांगलेच आक्रमक झालेत.


हे वक्तव्य आयुक्तांनी कशाच्या आधारावर केलं याचा जाब महासभेत विचारणार असल्याचं सभागृह नेत्यांनी म्हटलंय. तर या मालमत्ता अनधिकृत कशा ठरवल्या? आणि न्यायालयात ही माहिती कशी गेली? असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केलाय. 


महापालिकेत सध्या चार लाख मालमत्ता आहे. त्यापैंकी ३ लाख २७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण झाले असून त्यात २ लाख ६९ हजार मालमत्तांमध्ये अतिरिक्त बांधकाम आणि वापरात बदल आढळून आलाय. 


त्यामुळे उच्च न्यायालयाने या बांधकामांबाबत कडक पवित्रा घेतला... त्यात तुकाराम मुंढे यांच्या दाव्यामुळे तब्बल ७५ टक्के शहर अनधिकृत ठरणार असल्याने थंडीपूर्वीच नाशिककरांना हुडहुडी भरलीये.