उल्हासनगरात रुग्णाच्या अंत्यविधीला गेलेल्या 9 जणांना कोरोनाची लागण
उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली.
उल्हासनगर : आज एकाच दिवशी उल्हासनगरमधील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला गेलेल्या या ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आणखी इतर 2 रुग्ण हे उल्हासनगरमध्ये आज वाढले आहेत.
धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधीला कोणतीही काळजी घेतली गेली नव्हती. खन्ना कंपाऊंड येथे मागील आठवड्यात ५० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.
उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता ९२ वर पोहोचली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.