औरंगाबाद : मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनामध्ये ९ जणांचा बळी गेला आहे. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानं मराठवाड्यात अतिवृष्टीचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून 421 पैकी 170 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यंदा चांगला आणि वेळेवर पाऊस पडणार असा हवामान खात्यानं एप्रिल- मे महिन्यातच अंदाज व्यक्त केल्याने बळीराजानं जूनमध्ये पाऊस पडताच पेरण्या केल्या.


मात्र, त्यानंतर अधुन-मधून हजेरी लाऊन पाऊस गायब झाला होता. त्यामुळे मराठवाडयातील पिकं करपून गेली. या पिकामधून यावर्षी उत्पादन मिळणार नसलं तरी येणा-या रबी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणारय. शेतक-यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळाच्या पूर्वसंध्येला पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.