मुंबई : राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात सातत्याने गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Corona) घट पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 हजार 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 32 हजार 241 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (9 thousand 361 new corona patients found in maharashtra on 20 june 2021 and 190 died)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत किती रुग्ण?


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत (Corona In Mumbai) 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. पण आता हाच आकडा हजारांपेक्षा कमी झाला आहे. मुंबईत दिवसभरात  733 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आता एकूण 14 हजार 809 एक्टीव्ह रुग्ण आहेत. मुंबईता रुग्ण बरे होण्याचा दर 95 टक्के इतका आहे. कोरोना दुप्पटीचा दर हा 726 दिवसांवर पोहचला आहे.   



गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून फक्त 30+ नागरिकांनाच लसीकरण 


लसीकरण केंद्रावर (Vaccination) मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय. यामुळे लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच 21 जूनपासून मुंबईत 18 ते 29 वयोगटाचे लसीकरण होणार नाहीये. फक्त 30 वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 


त्यानुसार 249 लसीकरण केंद्रावर 30 वयोगटावरील व्यक्तींचे 50% वॉक इन आणि 50% ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन लसीकरण होणार आहे. तसेच 7 केंद्रांवर परदेशात जाणा-या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण असेल
सोबतच काही केंद्रावर कोवॅक्सिन लसीचे दुसरे डोस देण्यात येणार आहेत.  .


संबंधित बातम्या :


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य


Corona Update - कोरोनाची तिसरी लाट अटळ, एम्स प्रमुखांचा सावधगिरीचा इशारा