Kharghar Pandavkada Waterfall : पावसाळा सुरु झाल्यापासून सर्वच धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. राज्यातील अनेक धबधबे धोकादायक आहेत. यामुळे खबरदारी म्हणून येथे जाण्यास पर्यटकांना बंदी घातली जाते. नवी मुंबईतील खारघर येथील पांडव कडा धबधब्यावर देखील पर्यटकांना बंदी घालण्यात आलेय असे असताना अनेक पर्यटक चोरवाटेने या धबधब्यावर जातात. मात्र, हे अति धाडस एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतले आहे.  खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर  13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांडवकडा हा पनवेल मधील धोकादायक धबधबा समजला जातो.  पांडवकडा धबधब्यावर आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेय. हर्ष मिश्रा असे या 13 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. हर्ष आपल्या 5 मित्रांसह पांडवकडा धबधब्यावर गेला होता.


बंदी असतानाही चोर वाटेने धबधब्यावर गेला


पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी असतानाही हे सर्वजण चोर वाटेने पोहण्यासाठी गेला होते. पाण्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षचा मृत्यू झाला. मात्र, त्यासह असलेले इतर 5 जण सुदैवाने सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या सहाय्याने शोध घेतल्यावर काही तासांनी हर्षचा मृतदेह सापडला.  या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


पोलिसांचा खडा पहारा असताना अनेक जण धबधब्यावर जातात


नवी मुंबईतील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर जायला बंदी घालण्यात आली आहे. खारघर इथल्या या प्रसिद्ध धबधब्यावर पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांची गर्दी होते. मात्र इथे अपघातही होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इथं जायला बंदी घालण्यात आलीय. या पर्यटनस्थळाच्या आसपास पोलिसांचा खडा पहारा 


धबधबा की मृत्यूचा पांडवकडा


नवी मुंबईतल्या खारघरचा पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी मृत्यूचा धबधबा ठरलाय. वाढते अपघात लक्षात घेऊन या धबधब्यावर बंदी घालण्यात आलीय. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो. तरीही पोलिसांना गुंगारा देऊन पर्यटक पांडवकडा धबधब्याकडं जातात. चेंबूरमधून आलेल्या नऊ पर्यटकांपैकी चार पर्यटक धबधब्याच्या पाण्यात वाहून गेले होते. धबधबा पर्यटकांसाठी धोकादाय़क आहे. या धबधब्याच्या परिसरात सहलीसाठी येऊच नका असं आवाहन पोलीस आणि प्रशासनानं केलंय. धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटक जिवाची बाजी का लावतात असा सवाल विचारला जातोय.