बीड : जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बालकाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. आपल्या म्हशीला करणी करून मारल्याचा राग मनात धरून त्याचा बदला म्हणून शुभम सपकाळ या 6 वर्षांच्या मुलाला ठार केल्याची कबुली रोहिदास सपकाळ आणि देवईबाई सपकाळ या दाम्पत्यांने दिली. (A 6-year-old boy was Murder in Beed )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचे शुभमच्या कुटुंबियांशी जुने वाद होते. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभमचा मृतदेह बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आला होता. त्याच्या कुटुंबीयांनी यात घातापाताचा संशय व्यक्त केला होता. 


पाच रुपये मागितल्याने मुलीलाच आपटले


गोंदिया येथे धक्कादायक घटना घडली. मुलीने खाऊ खायला पाच रुपये मागितलें म्हणून जन्म दात्या वडिलानं पोटच्या मुलीला दारावर आपटले.. यातच या 5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. गोंदिया जिल्ह्याच्या लोणारा गावात ही सुन्न करणारी घटना घडली. २८ वर्षाच्या विवेक उईकेची 5 वर्षांची वैष्णवी नावाची मुलगी होती. वडील कामावरुन आल्यावर मुलगी रडत असल्याचं बघितले. (5-year-old girl was killed in Gondia)


आईने तिला खाऊ खायला 5 रुपये द्या असे सांगितले. तेव्हा रागाच्या भरात विवेक उईकेने मुलीला उचलत दरवाजावर आपटले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने मुलीचा तिथेच मृत्यू झाला. आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केलीय.