Maharashtra IPS Transfers : लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत.  राज्यातील 50हून जास्त वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे असे आदेश देखील वरिष्ठ पोलीस अधिकांऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यात बदली


नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झालीये. पुणे सह पोलीस आयुक्त पदी प्रवीण पवार यांची नियुक्ती झालीये. नागपूर पोलीस आयुक्त आता पुणे पोलीस दलाचा कारभार पाहणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झाली आहे. तर प्रवीण पवार यांची पुण्याच्या सह आयुक्त (joint Cp)पदी वर्णी लागली आहे. 


वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसवल्यामुळे अमितेश कुमार चर्चेत आले होते. सप्टेंबर २०२० रोजी अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम अमितेश कुमार यांच्या नावावर आहे.  1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. 


2007 मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. 


एम. सुदर्शन असतील नवे पोलिस अधीक्षक, विद्यमान अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची परभणी येथे बदली, सुदर्शन नागपूर येथे पोलीस उपायुक्त -गुन्हे या पदावर होते कार्यरत, शासनाने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या केलेल्या मोठ्या बदली आदेशात यांची नावे आहेत. यापूर्वी 16 जानेवारीला पुणे पोलीस आयुक्तालयातील 23 पोलीस निरीक्षक, 19 सहायक निरीक्षक आणि 76 उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.