पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Crime News: संशयाचं भूत डोक्यात शिरलं की माणूस आंधळा होता आणि असं काही कृत्य करुन बसतो ज्याचा त्याला आयुष्यभऱ फक्त पश्चाताप होतो. नागपुरात (Nagpur) अशीच एक घटना घडली आहे. फक्त संशयापोटी पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली. इतकंच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. हे सर्व करताना पतीने आपल्या लहान मुलीचाही विचार केला नाही. आई-वडिलांच्या जाण्याने एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे. 


नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे कॅन्सर पीडित पतीने गळफास घेत आत्महत्या केली. पण आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नीची हत्या केली. चारित्र्यावर संशय असल्यानेच पतीने हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सोनिया असं मृत महिलेचं नाव आहे. तर राजेश मंडले असं पतीचं नाव आहे.


सोनिया एका मॉलमध्ये कामाला होती. पती राजेशसह ती छावणी येथील मॉलच्या वसाहतीत राहत होती. सोनिया ही राजेशची दुसरी पत्नी होती. सोनियावर प्रेम जडल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला सोडून दिलं होतं. दरम्यान, राजेशला मागील तीन वर्षांपासून जबड्याच्या कॅन्सर झाला होता. त्यापासून तो त्रस्तही झाला होता. राजेश काही कामधंदाही करत नव्हता. याच आजाराला कंटाळून राजेशने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. 


पण राजेशने आत्महत्या करण्यापूर्वी आपली पत्नी सोनियालाही जीवाशी ठार मारलं. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. 


मात्र हे कृत्य करताना राजेशने त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीचा विचारही केला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. सदर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेय. पण संशयामुळे आणि आजारपणामुळे एक कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं आहे. 


महिलेवर बलात्कार


नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) आलेल्या विवाहित महिलेवर तिच्याच ओळखीच्या व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. सीताबर्डी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. 



पिंटु गजभिये, कार्तिक चौधरी अशी दोन आरोपींची नावे आहे. महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला मुळची मध्यप्रदेशातील आहे. गजभिये आणि तिची फेसबुकवर ओळख झाली. तेव्हा काम मिळवून देतो, असा बहाणा करत त्याने तिला नागपुरात येण्यास सांगितले. कामाच्या शोधात असलेल्या महिलेने त्याचे म्हणणं मान्य करत नागपुरात आली होती.