Anil Parab in connection with Dapoli resort alleged land deal scam : दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra Political News) माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीएस कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. अनिल परब ( Anil Parab) हे माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. 2012 पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेतजमीनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच हे बांधकाम करताना रोख रक्कम वापरण्यात आल्याचा संशयही त्यांनी बोलून दाखवला होता. शेतजमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.


माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापाेली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने जाहिरात दिली आहे. त्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. याविराेधात त्यांनी न्यायालयीन लढाई लढली हाेती. 


दरम्यान, हे रिसाॅर्ट आपले नाही, असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र, आता परब यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.