विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : ग्रामीण भागात बसची सीट मिळवण्यासाठी रुमाल टाकण्यापासून ते बॅग ठेवण्यापर्यंत अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. अनेक जण थेट खिडीकीतून बसमध्ये चढतात. मात्र, बसमध्ये सीट मिळवण्यासाठी एका अपंग व्यक्तीची (disabled person) धडपड पाहून सगळेच थक्क झाले आहे. संभाजीनगरमधील (Sambhajinagar)  हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे (Viral Video). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी वेगवेगळ्या शकल्ल लढवताना नेहमी दिसतात. मात्र, आता अपंग प्रवाशांना सुद्धा बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.  व्हायरल व्हिडिओवरुन हे दिसत आहे. 


हा व्हायरल व्हिडिओ संभाजी नगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील आहे.  पैठण बस मध्ये जागा मिळवण्यासाठी एक अपंग व्यक्ती बसच्या खिडकीतून बस मध्ये चढत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्यक्ती एका पायाने अपंग आहे. दीड पायावर हा व्यक्ती बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतोय. बसच्या चाकाजवळ या व्यक्तीने आपल्या कुबड्या उभ्या केल्या आहेत. यानंतर तो मोठी धडपड करुन अखेर खिडकीतून बसमध्ये चढतोच. 


हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. महामंडळाच्या बस मध्ये अपंग व्यक्तींसाठी राखीव जागा असतात. मात्र या राखीव जागा केवळ नावालाच असल्याचे या व्हिडिओवरुन दिसत आहे. यामुळेच अपंग व्यक्तींना बसमध्ये जागा मिळवण्यासाठी अशी धडपड करावी लागत आहे की काय प्रश्न उपस्थित झाला आहे.