प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा :  दारु म्हंटल ही डोळ्यासमोर येतात जिंगणारे तळीराम. भंडाऱ्यातील (Bhandara) एका शेतकऱ्याने शेतात चक्क शेतात देशी दारुची फवारणी केली आहे ( sprayed country liquor in the farm). YouTube वर व्हिडिओ पाहून या शेतकऱ्याने डोकं लावलं आहे. शेतकऱ्याने केलेल्या अनोख्या फवारणीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शराब हर मर्ज की दवा है... हे वाक्य आपन तळीरामांकडून नेहमीच ऐकत असतो. मात्र, देशी दारू धान पिकाला पोषक ठरत आहे. हे ऐकुन धक्का बसला न पण हे खरे आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आपल्या धान पऱ्याची उत्तम वाढ होण्यासाठी तसेच रोग आणि कीडी पासून बचाव करण्यासाठी धान पऱ्याला टॉनिक म्हणून देशी दारूची पाण्यासह फवारणी करत आहे. याउलट दारू ने धान पिक उत्तम येत असल्याचा विश्वास या शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.


शेतात देशी दारुची फवारणी होत असल्याचा सर्रास प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पहायला मिळत आहे. विशेषत: जेवनाळा येथील शेतकरी उन्हाळी धान पऱ्याच्या वाढीसाठी देशी दारूची फवारणी करतांना दिसत आहेत. परिसरात सध्या उन्हाळी धान रोवणीसाठी असलेल्या नर्सरी ची देखभाल सुरू आहे. 


वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पऱ्हे हे पिवळे पडून कीडग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे. रामदास गोंदोळे या युवा शेतकऱ्याने YouTube वरुन जालीम उपाय शोधला आहे. शेतात देशी दारूची फवारणी करत धान परे रोग मुक्त केले आहे. यासाठी एका फवारणी पंपात पाण्यासह 90 एम एल दारूचे मिश्रण करून ते फवारणी करीत आहे. YouTube वरुन व्हिडिओ पाहून रामदास याने हा उपाय शोधला आहे.  


धानाला देशी दारूचा उतारा ही माहिती परिसरात पसरताच इतर शेतकरी ही गोंदोळे यांच्या शेतात भेट देत आहेत. हे तंत्र समजून आपल्यां शेतात ही धान पिकावर फवारणी करणार असल्याचे सांगत आहे. एकीकडे खत-बियाने- फवारणी रोग औषधी महाग झाले असतांना केवळ 45 रूपयाच्या दारू ने पिक वाचवण्यास मदत होत आहे. 


कृषीविभागासाठी हा प्रयोग नवा नाही. पण कोणत्याही कृषी विद्यापीठानं पिकांवरील मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. पण, हा मद्यप्रयोग पिकांसाठी परिणामकारक असल्याचं कृषीशास्त्रज्ञ सांगतात. दारू दवा असते असं कुणीतरी म्हटलं होतं. हे वाक्य कोण्या तळीरामानं त्याच्या सोईसाठी म्हटलं असावं असं वाटतं होतं. रामदास गोंदोळे या शेतकऱ्याच्या भाताच्या पिकासाठी दारू दवा झालीय असं म्हणता येईल हेही तितकेच खरे.