पनवेलमध्ये मालगाडी रुळावरुन घसरली; रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पनवेल वसई रेल्वे वाहतबक विस्कळीत झाली आहे. या मार्गावर एक मालगाडी रुळावरुन घसरली आहे.
Panvel To Vasai Trains : पनवेल वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली आहे. मालगाडी चे चार डबे रुळावरुन घसरले आहेत. ही मालगाडी वसई कडे निघाली होती. मालगाडी रुळावरुन घसरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वेचे डबे बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रुळावर घसरेले डबे बाजूला हटवल्यानंतरच या मार्गावरची वाहतूक सुरळीत होईल. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे खोळंबल्या आहेत.
हार्बर लाईनवर 38 तासांचा रेल्वे मेगा ब्लॉक
हार्बर लाईनवर 38 तासांचा रेल्वे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. बेलापूर ते पनवेल स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक असले. शनिवारी 30 सप्टेंबरला रात्री 11 वाजल्यापासून सोमवारी 2 ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असणाराय.. वेस्टर्न फ्रेट कॅरिडोर अंतर्गत दोन नव्या रेल्वे लाईन बसवण्याच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे.
मडगाव ते पनवेल आणि पनवेल ते खेड दरम्यान मेमू रेल्वे
गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईत येणा-या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मडगाव ते पनवेल आणि पनवेल ते खेड दरम्यान मेमू रेल्वे चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलाय. या गाड्या अनारक्षित असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.