अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ इमारतीच्या डकमध्ये आढळल्यानंतर पोलिसांना याबद्दल कळवण्यात आलं. दोन महिलांवर याप्रकरणी संशय असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान हे बाळ कुमारी मातेचं होतं का? यासंदर्भात सध्या तपास सुरु आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीच्या सुमारास हे स्त्री अर्भक जन्माला आलं असून त्याला तिथून फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी इमारतीमधील रहिवाशांना हे बाळ इमारतीच्या डकमध्ये दिसलं. त्यांनी स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली. उमेश पाटील यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


पोलिसांनी सध्या हे बाळ ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यातदेखील घेतलं आहे. हे कृत्य कोणी केलं, स्त्री जातीचं अर्भक अविवाहित मातेचं होतं का?त्याला इमारतीवरून फेकलं गेलं की आणख काही यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.