Gondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...
Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे.
प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे नुकसान इतकं मोठं होतं की या घटनेमुळे घरातल्यांच्या अंगावरचे फक्त कपडेच राहिले आहेत. गोंदिया (gondia) जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या सातोना गावातील दिव्याच्या ज्योतिने तीन घराला आग लागली आहे. (a house in gondia gets burned as the mice in the house steals flame)
या आगीत संपूर्ण घर जळाले असून घरातील अन्नधान्य, साहित्य तसेच कपडे सुद्धा जळाले आहे. अंगावर घालणारे कपडे फक्त उरले आहे. त्यामुळे या कुटुंबांवर मोठे संकट आले असून या कुटूंबियांचे लाखो रुपयांचा नुकसान झालेला आहे. शकुंतला कुवरलाल रहांगडाले यांचा संपूर्ण परिवार दवाखान्यात गेल्या होत्या घरी मात्र त्यांचा लहान मुलगा प्रकाश (prakash) हा एकटा होता. प्रकाश हा मतिमंद असून त्यांनी रात्री घरात प्रकाश करण्यासाठी दिवा लावला मात्र दिवा जळत असताना त्या जळत्या दिव्याची ज्योत उंदरांनी (mice steals flame) घेऊन गेल्याने त्या जळत्या ज्योतीने घराला आग लागल्याचे बोलले जात आहे तर या आगीने संपूर्ण घराला आग लागली व बाजूला असलेल्या दोन घरांना सुद्धा आग लागल्याने या आगीत शकुंतला राहांगडाले, राजेश्वर राहांगडाले, दिनेश्वर राहांगडाले ह्या लोकांचे तीन घर जळून खाक झाले.
हेही वाचा - Engineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम
आगीत संपूर्ण अन्नधान्य, साहित्य तसेच कपडे सुद्धा जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर अंगावर घातलेले कपडे मात्र उरले आहे. त्यामुळे शासनाने या कुटूंबियांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी कुटूंबियांनी तसेच गावकर्यांनी केली आहे. ही आग अंदाजे 12 वाजता लागली आहे. घरी कोणीच नसल्याने आगीचे प्रमाण वाढू लागले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले ही आग इतकी मोठी होती की विझवण्यासाठी अनेक लोकांची गरज होती. आमच्याकडे आता काहीच राहिलं नाही. आमचं खूपच नुकसान झालं आहे. फक्त अंगावर कपडे मात्र तेवढे राहिले आहेत, असं या घरातील कुटुंबानं सांगितले.
पाहा व्हिडीओ -
घरात कोणीच नसल्यानं आणि मुलगा मतिमंद असल्यानं घरात महिलाही नव्हत्या. यामुळे घरात कोणाकडे कुठेच लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. यामुळे खुप मोठा प्रोब्लेम झाला परंतु यासाठी निरिक्षकांनी मदत करावी अशी आशा सगळ्यांनाच आहे.