पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवर गेला अन् पुढील 40 मिनिटं पंख्याला....; नागपुरातील धक्कादायक घटना
Crime News: नागपुरात (Nagpur) एका व्यक्तीने गळफास (Suicide) घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्या करताना पत्नीच्या फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन लाईव्ह केलं. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
Crime News: नागपुरात एका 27 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्या करताना फेसबुकवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. जवळपास 40 मिनिटं हे लाईव्ह सुरु होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लाईव्ह करण्यासाठी त्याने आपल्या पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन लॉग इन केलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह केलं होतं. यानंतर तब्बल 40 मिनिटं तो लाईव्ह होता. पोलिसांना सांगितल्यानुसार, तो बेरोजगार होता तसंच मद्याच्या आहारी गेला होता. तसंच त्यांची पत्नीसह वारंवार भांडणं होत होती.
सोमवारी कुटुंबीय घराबाहेर असताना त्याने मद्यपान केलं आणि रात्री उशिरा पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन लॉग इन केलं. मोबाइल लॉग इन केल्यानंतर त्याने काही वेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे नातेवाईक, शेजारी आणि मित्रांनी घराबाहेर गर्दी केली होती. पोलीसही काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघाची मृत्यूची नोंद केली आहे.