Video: तो आला, गळ्यात चेन घातली आणि गेला... दुकानदाराला पण नेमकं कळलं नाही काय झालं?
Nagpur news: ज्वेलरच्या दुकानात सोन्याची चेन खरेदी करत असल्याचे दाखवून चोरट्याने सोन्याची चेन गळयात घालून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर: ज्वेलरच्या दुकानात सोन्याची चेन खरेदी करत असल्याचे दाखवून चोरट्याने सोन्याची चेन गळयात घालून पळ काढल्याची घटना नागपुरात (nagpur) घडली आहे. चित्रपटात शोभेल अशी ही घटना सीसीटीव्ही (cctv) त चित्रित झाली आहे. ज्वेलरच्या दुकानातून हा चोरटा पळताना आणि त्याच्यामागे दुकानातील कर्मचारी धावत पाठलाग करताना सीसीटीव्ही चित्रित झाले आहे. प्रणव पाटील असे चोरट्याचे नाव असून त्याला पळून जाताना लोकांनी पकडून पोलिसात दिले. नागपूरच्या दीघोरी जवळील चामट चौकात रेणुका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी संध्याकाळी आरोपीचोरटा प्रणव पाटील हा सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. दुकानात त्याला चेन दाखवत असताना त्याने घालून बघायच्या बहाण्याने चेन (golden chain) गळ्यात टाकली आणि तिथून पळ काढला. आरोपी धावत दुकानाबाहेर पडत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले. मागून दुकानदार आणि कर्मचारी ओरडत आल्याने लोकांनी लोकांनी आरोपीला पकडले. पोलिसांच्या स्वाधीन केलं. (a man tries to steal golden jewellery at a shop police grabs him)
चोरीच्या गंभीर घटना थांबेना :
महाराष्ट्र शासनाकडुन शालेय विदयार्थीना विनामुल्य पुरवण्यात येणारा पोषण आहाराची बेकायदेशीर साठवणूक व अपहार करत थेट काळया बाजारात विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी सापळा रचत नुकतेच पकडले. ही घटना नाशिकच्या मालेगाव येथील ताश्कंद बाग दगडी हायस्कूल पाठीमागे घडली. याप्रकरणी पोलिसांनी धान्य (transport) वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकसह 24 लाख 43 हजार 965 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत शेख उबेद शेख बाबू रा.मालेगाव व चालक प्रल्हाद दत्तू सावंत रा.धुळे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान तब्बल 25 लाख रुपयांचा विद्यार्थ्यांना विनामूल्य दिला जाणारा पोषण आहार काळया बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडल्याने पोषण आहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे.
नाशिकच्या सिडकोतील भुजबळ फार्म परिसरात (bhujbal farms at nashik) असलेल्या दूर्गा आय हॉस्पिटलमधीलच कर्मचाऱ्याने 5 लाखांच्या रोकडसह हॉस्पिटलच्या हिशोबातील सुमारे 3 लाख असा 8 लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. आकाश लक्ष्मण काळे असे संशयित कर्मचारयाचे नाव आहे. डॉ. भाला यांचे भुजबळ फार्म परिसरात दूर्गा आय हॉस्पिटल आहे. गेल्या 10 नोव्हेंबर रोजी त्यांना त्यांच्या अकोला या मुळगावी जायचे असल्याने त्या घरातून पाच लाखांची रोकड पर्समध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्या.