Mumbai Crime News : मेडिकलचे शिक्षण घेवून डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने आपल्या शिक्षणाचा भलताच उपयोग केला आहे. एका झोपडीत ड्रग्ज निर्मीती करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मेडिकलचा विद्यार्थी असलेला हा तरुण ड्रग्ड बनवून ते विकत होता. मालवणी पोलिसांनी याच्या या ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मालवणी पोलिसांनी अंमली पदार्थ तयार करणाऱ्या एका लॅबचा पर्दाफाश केला. 5 जानेवारीला अब्रार इब्राहिम शेख या आरोपीला एमडी ड्रग्जसह पकडण्यात आलं होते. त्याच्या चौकशीतून  या अवैध लॅबची माहिती सापडी होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या लॅबवर धाड टाकली. यावेळी ड्रग्ज बनवण्याच्या उपकरणांसह कोट्यवधींची औषधे जप्त कऱण्यात आली.तसंच एकाला अटक करण्यात आली. 


ड्रग्ज माफियांविरोधात पोलिसांचे सातत्याने धाडसत्र सुरु आहे,  मुंबईत दररोज ड्रग्जसह आरोपी पकडले जातात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त केले जाते. मात्र, तरीही मुंबई पोलिस ड्रग्ज माफियांवर सातत्याने कारवाई करत आहेत
मुंबईतील मालाड पश्चिम येथे मालवणी पोलिसांनी अशीच कारवाई केली. जिथे ड्रग्ज बनवणाऱ्या लॅबचा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला. 5 जानेवारी रोजी मालवणी पोलिसांच्या निगराणी पथकाने गस्तीदरम्यान एका आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून एक ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 100 पातळ बाटल्या जप्त करण्यात आल्या. अबरार इब्राहिम शेख (३०) असे आरोपीचे नाव आहे. जो मालवणीचा रहिवासी आहे. 


अबरार इब्राहिम शेख याच्याकडे अधिक चौकशी केली असता  नूर आलम मेहबूब आलम चौधरी ( वय 24) याच्याकडून ड्रग्ज घेतल्याचे सांगितले. अबरार इब्राहिम शेख याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालवणी परिसरात असलेल्या एका झोपडीवर धाड टाकली. यावेळी  आरोपी नूर आलम मेहबूब आलम चौधरी येथे ड्रग्ज तयार करत होता. पोलिसांनी ड्रग्ज निर्मीतीसाठी आणलेला कच्चा माल तसेच यासाठी लागणारे साहित्य असा कोट्यावधीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नूर आलम मेहबूब आलम चौधरी हा मेडिकलचे शिक्षण घेत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. 


डिजे गोवा गिल या गर्दुल्ल्या बाबासाठी ठाण्यात रेव्ह पार्टी


थर्टी फस्टच्या दिवशी ठाण्यातील कासारवडवली भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीचं गोवा कनेक्शन उघड झाले आहे. डिजे गोवा गिल या गर्दुल्ल्या बाबासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी गोवा गिलचा मृत्यू झाला होता. त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ठाण्यात या रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत सहभागी झालेल्या 100हून अधिक तरुणांना पोलिसांनी अटक केलीये. त्यांच्याकडून चरस, एलएसडी, गांजा यासह दारुचा मोठा साठाही जप्त करण्यात आला होता. या पार्टीत सहभागी होण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करण्यात आलाय. सोशल मीडियावरुन अनेकांना पार्टिचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.