वर्धा : मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. एका बाजूला राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना आता पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. असं होत असताना विदर्भातील वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. येथे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, काल संध्याकाळी मुसळधार पावसाने नाल्याला पूर आल्याने बाईक स्वारासह बाईक देखील वाहून जात असल्याचा हा व्हिडिओ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या टिटाणे गावांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या गावातल्या रस्त्यांमध्ये नदीत पूर यावा तशी परिस्थिती रस्त्यांवर निर्माण झाली होती.  रस्त्यांवरून पुराचे पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहात एक वाहन चालक सुरक्षित सभागृहात पडला दुसरा मात्र अडकून पडला होता.


दुसरा वाहन चालक या पुराच्या पाण्यात मोटरसायकल सह  वाहून जाणार होता. मात्र स्थानिकांनी त्याला मदत करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. गाव परिसरांमध्ये शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, शेतामधे पाण्याचे मोठे तलाव निर्माण झाल्याचे  चित्र निर्माण झालं होतं. या भागामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



वर्धा येथे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्यांपैकी दोन महिला, एका पुरुषासह एका मुलाचा समावेश आहे. या मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही.नसोनेगाव आष्टा रोडवरील  शुक्रवारी संध्याकाळी घडली घटना आहे. शेतातून कामावरून परत जात असताना हे चौघे नाल्यातून वाहून गेलेत. (वर्धा जिल्ह्यात पावसाने हाहाकार, चार जण वाहून गेलेत) 


 


 नाल्याला अचानक पूर आल्याने काही पुरुष मजूर आणि महिला बैलगाडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते. अचानक बैलगाडी नाल्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात फसली गेली. यावेळी बैलगाडीतील दोन महिला पाण्यात फेकल्या गेल्यात. त्या वाहून गेल्यात. नाल्याला प्रचंड पाणी असल्याने आणखी दोघे वाहून गेलेत. 


विदर्भातील वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. येथे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, काल संध्याकाळी मुसळधार पावसाने नाल्याला पूर आल्याने चार जण वाहून गेले आहेत. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.