आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा 'पठाण' (Pathaan) चित्रपट  सध्या बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. जवळपास सर्वच थिएटरमध्ये 'पठाण'चा शो हाऊसफुल चालत आहे. सर्वच थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळत आहे. कल्याणमध्ये पठाण चित्रपट पहायला गेलेल्या पती पत्नीसह भयानक घटना घडली आहे. यावरुन थिएटरमध्येच तुफान राडा पहायला मिळाला (Kalyan Crime). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून टोळक्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली.  कल्याण येथील एस एम फाय थियेटर मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला.  पठाण सिनेमा बघायला गेलेल्या एका कुटुंबातील महिलेची एकाने छेड काढली. पतीने जाब विचारला असता महिलेचा पती आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण एस एम फाईव्ह थियेटर मध्ये घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे


कल्याण पश्चिम येथील एस एम फाईव्ह या थियेटर मध्ये पठाण चित्रपट सुरू आहे. 30 तारखेला रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती आपल्या पत्नी सोबत पठाण चित्रपट बघायला गेले होते.  तिकीट काढून चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रवेश करताना एकाने पत्नीची छेड काढत अपशब्द वापरले. यावरुन या दोघांमध्ये वाद झाला. या नंतर हे दोघे पती पत्नी आणि त्यांचा भाऊ थियेटर मधून बाहेर निघत असताना गेटवरच काही तरुण त्यांची वाट बघत होते.


हे तिघे बाहेर पडताच या टोळक्याने त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत  तक्रादार व्यक्ती आणि त्याच्या भावाला गंभीर दुखापत झाली आहेय दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी प्रभाकर म्हात्रे दुर्वेश म्हात्रे प्रसाद म्हात्रे यांच्यासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.